मुंबई : आगामी काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामाना रंगण्याची शक्यता आहे. परंतु निवडणुकांच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे समोर आला आहे. देशातील लोकप्रिय टॉप दहा मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांना आपले स्थान राखता आले नाहीत. यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील आमदार रोहित पवार यांनी टिका केली आहे.
हेही वाचा..“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या बाबत ‘मूड ऑफ दे नेशन’च्या वतीने देशातील प्रत्येक राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत मागच्या वर्षापेक्षा यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियती घसरली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे शेवटून तिसरे असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे. राज्यात झालेली पक्ष फुट, गुंडागिरी प्रकरण, महिला अत्याचार, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून एकनाथ शिंदे यांना जनतेने नाकारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सर्व्हेनुसार फक्त १.९ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर या सर्व्हेत ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अव्वल स्थानी असून त्यांना जनतेने तब्बल ५२.७ लोकांनी पंसती दर्शवली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली, छत्रपतींचा केला अपमान”
दरम्यान, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आधी महाराष्ट्र टॉप पाचमध्ये असायचा आता टॉप १० मध्ये असतो. फरक स्पष्ट आहे. इंडीया टुडेच्या मुड ऑफ नेशन च्या सर्व्हेची ही आकडेवारी बघता महाराष्ट्र भाजपची विशेषता डी टिमची कारस्थाने यशस्वी होताना दिसत आहेत. सरकारमधील सत्तेच्या वर्चस्वसाठी सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे ज्याप्रमाणे लोकप्रिय मुख्यमंत्री या गटात महाराष्ट्र खाली सरकला आहे. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था आणि विकासाच्या बाबतीतही महाराष्ट्र खाली सरकत आहे. शिवाय हे सरकार असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील असा इशारा देखील रोहित पवारांनी राज्य सरकारला दिला आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आधी महाराष्ट्र टॉप 5 मध्ये असायचा आता टॉप 10 मध्ये असतो. #फरक_स्पष्ट_आहे, @IndiaToday #MoodOfTheNation सर्व्हेची ही आकडेवारी बघता महाराष्ट्र भाजपची विशेषता #D-team ची कारस्थाने यशस्वी होताना दिसतायेत.
सरकारमधील सत्तेच्या वर्चस्वासाठी… pic.twitter.com/YOWgInJ7LT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा..महिन्याआधी भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची दावेदार, केतकी पाटलांचा रावेरमध्ये कार्यक्रमांचा धडका
हेही वाचामहाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटेना, महाराष्ट्राच्या प्रभारीला घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी गाठलं थेट मातोश्री
हेही वाचा“आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलंय, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार”
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार ? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले…
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” उद्धव ठाकरेंची टिका फडणवीसांना झोंबली