मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन पोहचल्या आहेत. तरी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाहीय. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ठाकरे गट अजूनही १८ जागांवर आग्रही दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला वंचितला देखील महाविकास आघाडीत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यातच आज महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी थेट मातोश्री गाठली आहे.
हेही वाचा…निवडणुकांआधीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली?
महाविकास आघाडीकडून जागा वाटपावर बोलणी होत असली तरी अजूनही जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाव्यात यासाठी कॉंग्रेस आग्रही आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट देखील मुंबईच्या जागांबाबत आग्रही असल्याचे दिसत आहे. मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी कॉंग्रेसकडून बोलणी सुरू आहे. तर ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढविण्यास इच्छूक आहेत.
हेही वाचा…“त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ?”उद्धव ठाकरेंना उपस्थित केला सवाल
दरम्यान, लोकसभा जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अनेकदा बैठका झाल्यात. पंरतु जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाही. यातच आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह रमेश चेन्निथला, वर्षा गायकवाड. नानाभाऊ गावंडे यांच्यासह कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चा केली. यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ? तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का ? याबाबत आता सवाल उपस्थित केले जात आहेत.
READ ALSO :
हेही वाचा“आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलंय, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार”
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार ? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले…
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” उद्धव ठाकरेंची टिका फडणवीसांना झोंबली
हेही वाचा..“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली, छत्रपतींचा केला अपमान”