पुणे : काल निर्भय बनो सभेच्या आधी पत्रकार निखील वागळे यांच्यावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. निखील वागळे यांच्या गाडीवर यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंडी, शाई फेक करत गाडीची काचा फोडली. या घटनेतून निखील वागळे कसेबसे बचावले. तर यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील निखील वागळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वाचवले. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्त्यांचा देखील सहभाग आहे. यातच शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता.
हेही वाचा…“त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ?”उद्धव ठाकरेंना उपस्थित केला सवाल
आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलं आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार आहोत. हुकूमशाहीच्या विरोधात आमचा हा निकराचा लढा आहे. या लढ्यात आज स्वत: चं रक्त सांडणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विशेष:त महिला भगिनींचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले. तसेच मनगटाची तलवार व छातीची ढाल करून आज आमचे कार्यकर्ते लढले. भाजपच्या षंढांनी फेकलेले दगड आणि शाई स्वतःच्या अंगावर झेलत दडपशाहीचा प्रतिकार केला असंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं
दरम्यान,खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटकरून राज्य सरकारवर टिका केली आहे. पत्रकार निखील वागळे आणि सहकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला करीत असताना भाजपच्या उन्मादी टोळीने घातलेला धुडगुस अक्षम्य होता. यावेळी वागळेंच्या गाडीला संरक्षण देण्यासाठी सरसावलेल्या भक्ती कुंभार आणि इतर भगिनींना देखील भाजपच्या गुंडांनी मारहाण करून अर्वाच्च शिवीगाळ केली. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार ? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले…
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” उद्धव ठाकरेंची टिका फडणवीसांना झोंबली
हेही वाचा..“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली, छत्रपतींचा केला अपमान”
हेही वाचा…निवडणुकांआधीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली?