मुंबई : आगामी काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामाना रंगण्याची शक्यता आहे. परंतु निवडणुकांच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे समोर आला आहे. देशातील लोकप्रिय टॉप दहा मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांना आपले स्थान राखता आले नाहीत.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या बाबत ‘मूड ऑफ दे नेशन’च्या वतीने देशातील प्रत्येक राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत मागच्या वर्षापेक्षा यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियती घसरली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे शेवटून तिसरे असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे.
हेही वाचा…“काल मृत्यू दारात उभा राहिला होता, केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो”, मोठ्या राड्यानंतर निखील वागळेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यात झालेली पक्ष फुट, गुंडागिरी प्रकरण, महिला अत्याचार, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून एकनाथ शिंदे यांना जनतेने नाकारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सर्व्हेनुसार फक्त १.९ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर या सर्व्हेत ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अव्वल स्थानी असून त्यांना जनतेने तब्बल ५२.७ लोकांनी पंसती दर्शवली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून त्यांना ५१.३ टक्के लोकांनी मतं दिली आहेत. यातच ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत त्यांना ४६.९ टक्के मते पडली होती. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा याठिकाणी लोकांना आवडलेला दिसत आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांना लोकांनी ४८.६ टक्के मते दिली असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा…“मूर्खपणाचा डोंगर, संजय बांगर !” तर तुम्ही जेवण करू नका, बांगरांचा लहान मुलांना अजब सल्ला, विरोधकांचा हल्लाबोल
सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल असून त्यांना ४२.६ टक्के मते गुजराती लोकांनी दिली आहे. तर पाचव्या स्थानी असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा यांना जनतेने ४१.१ टक्के पसंती दिली आहे. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना ४१.१ टक्के असून ते सातव्या स्थानी आले आहेत. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आठव्या स्थानी असून त्यांना ३६.५ टक्के मतं पडली आहेत.
दरम्यान, नवव्या स्थानी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन असून त्यांना ३५.८ टक्के मिळाली आहेत. तर दहाव्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून त्यांना ३२. ८ टक्के पसंती मिळाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ?”उद्धव ठाकरेंना उपस्थित केला सवाल
हेही वाचा…फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा..पुण्यात मोठा राडा..! भाजपच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण अन् अर्वाच्च शिवीगाळ, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…
हेही वाचा…“गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ ! आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा”
हेही वाचा…जागा शिवसेनेची, दावा राष्ट्रवादीचा, लोकसभेच्या निवडणुकाकरिता उमेदवारासाठी ठराव मंजूर