IMPIMP

पुण्यात मोठा राडा..! भाजपच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण अन् अर्वाच्च शिवीगाळ, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

Supriya Sule said that women were beaten and verbally abused by BJP workers

पुणे : निर्भय बनो सभेच्या आधी पत्रकार निखील वागळे यांच्यावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. निखील वागळे यांच्या गाडीवर यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंडी, शाई फेक करत गाडीची काचा फोडली. या घटनेतून निखील वागळे कसेबसे बचावले. तर यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील निखील वागळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वाचवले. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्त्यांचा देखील सहभाग आहे. परंतु यावेळी महिलांना शिवीगाळ करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार टिका केली आहे.

हेही वाचा…“निखिल वागळेंची गाडी फोडणारे आणि हल्ला करणारेही कुत्रेच होते का ?” रोहित पवारांचा रोखठोक फडणवीसांना सवाल 

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटकरून राज्य सरकारवर टिका केली आहे. पत्रकार निखील वागळे आणि सहकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला करीत असताना भाजपच्या उन्मादी टोळीने घातलेला धुडगुस अक्षम्य होता. यावेळी वागळेंच्या गाडीला संरक्षण देण्यासाठी सरसावलेल्या भक्ती कुंभार आणि इतर भगिनींना देखील भाजपच्या गुंडांनी मारहाण करून अर्वाच्च  शिवीगाळ केली. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा…“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं

दरम्यान, एकीकडे बेटी बचाव म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांना अशी वागणूक द्यायची, नारीशक्तीचा हाच का सन्मान आणि हेच का भाजपचे संस्कार? देश आणि राज्यात पुर्ण बहुमतातील सरकार, संपुर्ण शासन, प्रशासन यांच्याच हातात पण तरीही भाजपला धिंगाणा घालायची गरज का वाटते ? असा सवाल करत त्यांना नेमकी भीती कशाची वाटते ? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच भाजपला लोकशाही मान्य नाही का ? लेकींवर हात उचलण्याची हिमंत होतेच कशी ? महिलांवर हात उचलणाऱ्या भाजपचा जाहीर निषेध. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

READ ALSO :

हेही वाचा…“गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ ! आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा” 

हेही वाचा…जागा शिवसेनेची, दावा राष्ट्रवादीचा, लोकसभेच्या निवडणुकाकरिता उमेदवारासाठी ठराव मंजूर 

हेही वाचा…“काल मृत्यू दारात उभा राहिला होता, केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो”, मोठ्या राड्यानंतर निखील वागळेंची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा“मूर्खपणाचा डोंगर, संजय बांगर !” तर तुम्ही जेवण करू नका, बांगरांचा लहान मुलांना अजब सल्ला, विरोधकांचा हल्लाबोल 

हेही वाचाभुजबळांची ह’त्या कशी अन् कधी करायची ? ‘त्या’ हॉटेलमध्ये शिजला कट, पत्रात धक्कादायक गोष्टी उघड 

Total
0
Shares
Previous Article
This storm of bullying is closer to the common people now the Home Minister must resign

"गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ ! आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा"

Next Article
Fadtoos-Kalank have become very mild words, has Maharashtra got a 'psychopath' Home Minister? Thackeray dissed Fadnavis

फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं

Related Posts
Total
0
Share