पुणे : पुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमासाठी येत असलेल्या पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस बंदोबंदात प्राणघातक हल्ला करण्यात आला. निर्भय बनो सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पुण्यात काल मोठा राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वागळे यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या. तसेच निखील वागळे यांच्यावर अंडी, शाई देखील फेकण्यात आली. या अशा संपुर्ण राड्यात निखील वागळे कसबसे बचावले. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी
पुण्यात झालेल्या राड्यात ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्यांचा निखिल वागळे यांनी आभार मानले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो, काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो. मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे. आजवर सहा हल्ले पचवले.
हेही वाचा…“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या,” राज ठाकरेंची मोदींकडे मागणी
कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे. आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच. असंही निखील वागळे यांनी म्हटले आहे.
प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,
काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड…
— nikhil wagle (@waglenikhil) February 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मूर्खपणाचा डोंगर, संजय बांगर !” तर तुम्ही जेवण करू नका, बांगरांचा लहान मुलांना अजब सल्ला, विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचाभुजबळांची ह’त्या कशी अन् कधी करायची ? ‘त्या’ हॉटेलमध्ये शिजला कट, पत्रात धक्कादायक गोष्टी उघड
हेही वाचा…“निखिल वागळेंची गाडी फोडणारे आणि हल्ला करणारेही कुत्रेच होते का ?” रोहित पवारांचा रोखठोक फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं
हेही वाचा…मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ? कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा समावेश