मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सुधारणांचे प्रणेते चौधरी चरणसिंह, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार घोषीत केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली आहे. याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकुर तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देखील भारतरत्न पुरस्कार घोषित केला आहे. यातच आता हिंदुह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा…मॉरिसने स्वत:वर गोळ्या का घातल्या? धक्कादायक माहिती समोर
राज ठाकरे म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. या यादीतले एस. स्वामिनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता.
हेही वाचा…“तर सभा उधळवून लावू, भाजपचा इशारा,” कॉंग्रेसनेही पुढे सरसावली, आज पुण्यात निर्भय बनो सभा
पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल. असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा… pic.twitter.com/2V4niOX7Au
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…बागेश्वर बाबाला फडणवीसांनी दिली तंबी ? वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावलं, रोहित पवारांचं विधान
हेही वाचा…मॉरिसने घोसाळकरांचा काटा का काढला ? पोलिसांनी ताब्यात घेतलेले मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?
हेही वाचा…“चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार,” मोदींनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! फडणवीसांच्यावर प्रत्युत्तरावर ठाकरे गटाचा पलटवार
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभेसाठी पहिला ‘उमेदवार’ ठरला,” जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा