पुणे : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे कथित बागेश्वर बाबाने पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे दौऱ्यावर आले असता बागेश्वर बाबा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही मिनिटे चर्चा झाली. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“तर सभा उधळवून लावू, भाजपचा इशारा,” कॉंग्रेसनेही पुढे सरसावली, आज पुण्यात निर्भय बनो सभा
रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि बागेश्वर बाबाच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. त्यावर जगदगुरू संत श्री तुकाराम महाराजांविषयी या कथित बाबाने काढलेले अनुद्गार हे चुकीचेच आणि तमाम मराठी माणसाच्या भावना दुखावणारे होते अशा शब्दांत फडणवीस साहेबांनी त्यांना यावेळी सुनावलं असेल आणि यापुढंही महाराष्ट्रातील संतांविषयी आणि थोर व्यक्तींविषयी अशी बेताल वक्तव्ये करू नयेत अशी तंबीही दिली असेल अशी अपेक्षा असल्याचे रोहित पवारांनी म्हटले.
हेही वाचा…महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देणार, ‘या’ लोकसभा मतदारसंघाबाबत रणनिती ठरली
दरम्यान, अलिकडेच बागेश्वर बाबाने संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होते. त्यावरून राज्यातील विरोधकांनी बागेश्वर बाबांवर जोरदार टिका करत माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर बागेश्वर बाबाने या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. त्यानंतर बागेश्वर बाबा याआधी पुण्यात येऊन गेले आहेत.
कथित बागेश्वर बाबाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत पुण्यात भेट झाल्याची बातमी वाचनात आली. या भेटीच्या वेळी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांविषयी या कथित बाबाने काढलेले अनुद्गार हे चुकीचेच आणि तमाम मराठी माणसाच्या भावना दुखावणारे होते अशा स्पष्ट शब्दांत फडणवीस… pic.twitter.com/HgFk6cLivY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मॉरिसने घोसाळकरांचा काटा का काढला ? पोलिसांनी ताब्यात घेतलेले मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?
हेही वाचा…“चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार,” मोदींनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! फडणवीसांच्यावर प्रत्युत्तरावर ठाकरे गटाचा पलटवार
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभेसाठी पहिला ‘उमेदवार’ ठरला,” जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…मॉरिसने स्वत:वर गोळ्या का घातल्या? धक्कादायक माहिती समोर