पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता राज्यात शरद पवार गट चांगलाच सक्रीय झाला आहे. निवडणुक आयोगाच्या निकालानंतर प्रथमच शरद पवार गटाचा हडपसर विधानसभा मतदारसंघात मेळावा पार पडला. चिन्ह आणि घड्याळ गेलं तरी आपल्यासोबत शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे पुन्हा लढू आणि बंडखोरांना धडा शिकवू असं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हडपसर विधानसभा आणि शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार घोषित केला आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
नेताजी सुभाष मंगल कार्यालयात शरद पवार गटाने हडपसर विधानसभा मतदारसंघात विजय निश्चित मेळाव्याचं आयोजन केलं होतं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळे शहराध्यक्ष प्रशांगत जगताप, जयदेव गायकवाड इत्यादी नेते या मेळाव्याला उपस्थित होते. यातच आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना पाठवा असे आवाहाने जयंत पाटील यांनी केलं.
हेही वाचा….“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
मागील विधानसभा निवडणुकीत हडपसरमधून आमदार चेतन तुपे यांनी केवळ २ हजार ३०० मताधिक्क्याने विजय मिळवला होता. येथील पक्ष संघटित ठेवण्यासाठी काम त्यांनी करणे अपेक्षित होते, परंतु तसे काही घडले नाही. भाजपची मते मिळून निवडून येऊ. असे कुणी स्वपन्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला ओळखलेले नसल्याचे जयंत पाटलांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी अजित पवारांची वाट धरली. पक्षाची पडझड होत असतानाही प्रशांत जगताप ठामपणे शरद पवार यांच्या मागे उभे राहिले. फुट पाडण्याआधी जगताप हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष होते. फुटीनंतर शरद पवार गटाचे शहाराध्यक्षपदीही त्यांच्याकडे कायम राहिले. त्यामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे विरूद्ध प्रशांत जगताप असा सामाना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मॉरिसने स्वत:वर गोळ्या का घातल्या? धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“तर सभा उधळवून लावू, भाजपचा इशारा,” कॉंग्रेसनेही पुढे सरसावली, आज पुण्यात निर्भय बनो सभा
हेही वाचा…महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देणार, ‘या’ लोकसभा मतदारसंघाबाबत रणनिती ठरली
हेही वाचा…संसदेत पुण्याच्या नवीन विमानतळाचा मुद्दा, प्रश्न हिंदीत, उत्तर मराठीत, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश