मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांची काल गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मॉरिस भाई नावाच्या गुंडाने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतलं. यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. तो मिटवण्यासाठी दोघांनी फेसबुक लाईव्ह केलं. परंतु फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा….“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
मॉरिसभाई आणि अभिषेक घोसाळकर यांचं कार्यालय आजूबाजूलाच असून दोघांमध्ये फारसं जमत नव्हतं. मॉरिरभाईने काल घोसाळकर यांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. त्यामुळे घोसाळकर हे सर्व वाद विसरून त्यांच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमाआधी मॉरिसभाई घोसाळकर यांना आपल्या कार्यक्रयाल घेऊन आले. त्यानंतर त्याठिकाणी ही घटना घडली.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?
दरम्यान, पोलिस कारवाईच्या भीतीने आणि चौकश्यांच्या ससेमिरा नको म्हणून मॉरिसने स्वत: ला संपवल्याचं सांगितलं जात आहे. तशी परिसरात चर्चाही सुरू झाली आहे. मात्र, मॉरिसने स्वत:ला का संपवलं याचा छडा लावण्याचं काम पोलिस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासातूनच सत्य बाहेर येणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर सभा उधळवून लावू, भाजपचा इशारा,” कॉंग्रेसनेही पुढे सरसावली, आज पुण्यात निर्भय बनो सभा
हेही वाचा…महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देणार, ‘या’ लोकसभा मतदारसंघाबाबत रणनिती ठरली
हेही वाचा…संसदेत पुण्याच्या नवीन विमानतळाचा मुद्दा, प्रश्न हिंदीत, उत्तर मराठीत, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी