कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षांनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. यातच हातगणंकल्यात लोकसभेसाठी उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. कारण स्वाभिमानी संघटनेचे नेते राज शेट्टी यांना ही जागा सोडली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी होणार नाहीत. परंतु याठिकाणी महाविकास आघाडी कोणताही उमेदवार देणार नसल्याचे सांगितलं जात आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!
आगामी लोकसभा निवडणुकीत हातगणंकले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणुक लढवणार आहेत. यातच कॉंग्रेस तसेच ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीत येण्याबाबत राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. मात्र महाविकास आघाडीत येण्यास शेट्टी यांनी नकार दिला आहे. तरीही ही जागा राजू शेट्टी यांना सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवू,” महेश लांडगे यांनी दिली इशारा, प्रकरण काय ?
दरम्यान, कोल्हापुर लोकसभा मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडली. तर दुसऱ्या बाजूला हातगणंकलेचे खासदार धैर्यशिलराव माने यांनी देखील शिंदेंची वाट धरली. आता या दोन्ही मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. तर यासाठी कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून विजय देवणे आणि संजय घाटगे हे ठाकरे गटाकडून निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. तर हातकणंगलेमधून सुजित मिनचेकर आणि उल्हास पाटलांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…संसदेत पुण्याच्या नवीन विमानतळाचा मुद्दा, प्रश्न हिंदीत, उत्तर मराठीत, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
हेही वाचा.“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?