पुणे : आपल्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन सातत्याने करून सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही. कायदा व सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी पुणे शहर भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांना केली. त्यावर आता पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?
पुण्यात ९ फेब्रुवारी रोजी दडपशाहीच्या विरोधात लोकशाही रक्षणासाठी निर्भय बनो सभा निळु फुले सभागृह याठिकाणी होणार आहे. यासभेसाठी पत्रकार निखिल वागळे, वकिल असीम सरोदे, अमोल पालेकर, कुमार नागे, रेश्मा रामचंद्र, शिल्पा बल्लाळ, अश्विनी सातव भाषण करणार आहेत. परंतु या सभेला भाजपने विरोध केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!
मागील काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत रत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केले होते केवळ प्रसिद्धी साठी वागळे हे सातत्याने अशी भाष्ये करून सवंग लोकप्रियता मिळवत असतात. त्यांच्या भाषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वादग्रस्त माणसाचे भाषण पुण्यासारख्या शांतता प्रिय शहरात ठेऊन पुण्याची शांतता बिघडवत असेल तर ते भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू असा कडक इशारा घाटे यांनी दिला.
त्यावर अशी धमकी देणे ही भाजपकडून होणारी लोकशाहीची थट्टा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी आहे. ती अजिबात खपवून घेतील जाणार नाही. असे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देणार, ‘या’ लोकसभा मतदारसंघाबाबत रणनिती ठरली
हेही वाचा…संसदेत पुण्याच्या नवीन विमानतळाचा मुद्दा, प्रश्न हिंदीत, उत्तर मराठीत, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
हेही वाचा.“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा