मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस भाईने काल गोळ्या झाडून हत्या केली आहे. काही वैयक्तिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. जुना वाद मिटवण्यासाठी त्यांनी मॉरिस याच्या कार्यालयात फेसबुक लाईव्ह केले होते. परंतु फेसबुक लाईव्ह दरम्यानच मॉरिसेने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत: मॉरिसने गोळी घालून आत्महत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. परंतु याप्रकरणात आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा…महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देणार, ‘या’ लोकसभा मतदारसंघाबाबत रणनिती ठरली
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस ज्यावेळी फेसबुक लाईव्ह करत होते. तेव्हा फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिसने दोघांची नावं घेतली होती. यामध्ये मेहुल पारिख आणि रोहित साहू अशी दोघांची नावं असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. मॉरिसने गोळीबार केला होता. त्यावेळी दोघेही त्याठिकाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर घटनास्थळावरून पोलिसांनी १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.
हेही वाचा…संसदेत पुण्याच्या नवीन विमानतळाचा मुद्दा, प्रश्न हिंदीत, उत्तर मराठीत, नेमकं काय घडलं ?
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला मेहुल पारिख हा मॉरिसचा पीए आहे. त्याच्या चौकशीतून मॉरिसबद्दलची महत्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. मॉरिस आणि अभिषेख यांच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून वाद होता. मॉरिसला तुरूंगवास घडला होता. अभिषेक यांच्यामुळेच आपल्याला तुरूंगात जावं लागल्याचा त्याचा समच होता. त्यामुळे मॉरिसचा अभिषेक यांच्यावर राग होता. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्याशी जवळीश साधली. आपल्यातले मतभेत दुर झाल्याची माहिती फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून देऊ असं म्हणत त्यांनी हत्या केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार,” मोदींनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! फडणवीसांच्यावर प्रत्युत्तरावर ठाकरे गटाचा पलटवार
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभेसाठी पहिला ‘उमेदवार’ ठरला,” जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…मॉरिसने स्वत:वर गोळ्या का घातल्या? धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“तर सभा उधळवून लावू, भाजपचा इशारा,” कॉंग्रेसनेही पुढे सरसावली, आज पुण्यात निर्भय बनो सभा