पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून गोळीबार घटनांमुळे महाराष्ट्र पुर्णपणे हादरून गेला आहे. पुण्यात सुरूवातीली कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे प्रमुख महेश पाटील यांच्यावर गोळीबार केली. तर जळगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार केला. तर काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यावरून आता राज्यात विरोधकांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
राज्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सर्व प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्र्यांवर हल्ला चढवला असून मंत्रीपदाचा राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरून गाडी खाली कुत्रं आलं तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यावर क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! असं म्हणत ठाकरे गटाने फडणवीसांना डिवचलं आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
दरम्यान, महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे, विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा झालेला मृत्यू धक्कादायक आहे. ज्या पद्धतीने त्याचा खून झाला तो भयानक प्रकार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? हा प्रश्न मोठा होत चालला आहे. महाराष्ट्राची सर्व बाजूंनी होत असलेली अधोगती दुःखदायक आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! pic.twitter.com/O3CjO7wPLN
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभेसाठी पहिला ‘उमेदवार’ ठरला,” जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…मॉरिसने स्वत:वर गोळ्या का घातल्या? धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“तर सभा उधळवून लावू, भाजपचा इशारा,” कॉंग्रेसनेही पुढे सरसावली, आज पुण्यात निर्भय बनो सभा
हेही वाचा…महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देणार, ‘या’ लोकसभा मतदारसंघाबाबत रणनिती ठरली
हेही वाचा…संसदेत पुण्याच्या नवीन विमानतळाचा मुद्दा, प्रश्न हिंदीत, उत्तर मराठीत, नेमकं काय घडलं ?