मुंबई : मराठा आरक्षणाच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचं पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांच्या हत्येचा कट रचला जात असून त्यासाठी बैठक देखील घेण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या बैठकीसाठी पाच जण उपस्थित असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या फॉर्म हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…बागेश्वर बाबाला फडणवीसांनी दिली तंबी ? वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावलं, रोहित पवारांचं विधान
आतापर्यंत मला अनेक फोन आणि मॅसेज आले, परंतु आता तर पत्रचं आले आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत. परंतु काहीही झाले तरी मी माझी भूमिका, माझी आयडॉलॉजी सोडणार नाही. मी घरी बसू शकत नाही. जे परिणाम होतील, त्यासाठी आपली तयारी आहे. आता पोलिसांवर सर्व सोडून दिले आहे. पोलिस त्यांचा शोध घेतील. असे मंत्री भुजबळांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मॉरिसने घोसाळकरांचा काटा का काढला ? पोलिसांनी ताब्यात घेतलेले मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?
दरम्यान, छगन भुजबळांना आलेल्या पत्रात त्यात काही नंबर पण देण्यात आले असून काही गाड्यांचे नंबरही दिले आहे. तसेच ज्या हॉटलेसमोर बैठक झाली. त्या हॉटलेचे देखील नाव आहे. हत्येच्या कटासाठी पाच लोकांची बैठक झाली. ही बैठक ज्या हॉटेलसमोर झाली त्याची माहिती आहे. आता हा सर्व प्रकार पोलिसांवर सोपवून द्यायचे आहे. असेही भुजबळ म्हणाले. तसेच या प्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निखिल वागळेंची गाडी फोडणारे आणि हल्ला करणारेही कुत्रेच होते का ?” रोहित पवारांचा रोखठोक फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं
हेही वाचा…मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ? कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा समावेश
हेही वाचा…“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी
हेही वाचा…“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या,” राज ठाकरेंची मोदींकडे मागणी