हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चर्चेत आले आहेत. यावेळी संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे संतोष बांगरांवर राजकीय वर्तुळातून टिकेची झोड उठवली गेली आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या,” राज ठाकरेंची मोदींकडे मागणी
एका शाळेतला संतोष बांगरांचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. यावेळी तुमचे आई-वडिल जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी रहा. असा अजब सल्ला त्यांनी शाळकरी मुलांना दिला आहे. यातच आमदार बंगार त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शाळेला भेट दिली तेव्हा. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला आहे. त्यावरून मुर्खपणाचा डोंगर, संजय बांगर असं म्हणत प्रशांत जगताप यांनी बांगरांच्या सल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा…बागेश्वर बाबाला फडणवीसांनी दिली तंबी ? वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावलं, रोहित पवारांचं विधान
तर संतोष बांगराला मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का ? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले ? असा सवाल करत लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबाबत या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.
यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे! pic.twitter.com/eF5a193BDW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2024
READ ALSO :
हेही वाचाभुजबळांची ह’त्या कशी अन् कधी करायची ? ‘त्या’ हॉटेलमध्ये शिजला कट, पत्रात धक्कादायक गोष्टी उघड
हेही वाचा…“निखिल वागळेंची गाडी फोडणारे आणि हल्ला करणारेही कुत्रेच होते का ?” रोहित पवारांचा रोखठोक फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं
हेही वाचा…मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ? कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा समावेश
हेही वाचा…“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी