नागपूर : पुढच्या महिन्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रात झालेल्या पक्ष फुटीनंतर राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा राजकीय सामना होणार आहे. त्याची तयारीही आता जय्यतपणे सुरू झाली आहे. यातच जागा वाटपचा कार्यक्रम ठरण्याच्या आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून त्यासंदर्भात ठराव देखील मांडला आहे. त्यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ? कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा समावेश
नागपुर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाकरिता माजी आमदार प्रकाश गजभिजे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारी द्यावी, असा ठराव रविभवन येथील कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव झाला. रामटेकमध्ये सलग दोनवेळा शिवसेनेचा खासदार असून विद्यमान खासदार कृपाल तुमाणे सध्या शिंदे गटात आहेत. परंतु या जागेवरून शिवसेना कायम रिंगणात उतरत आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ठाकरे गटाचा या मतदारसंघावर पहिला दावा मानला जात होता. परंतु आता अजित पवार गटाने दावा सांगत उमेदवारही पुढे केला आहे.
हेही वाचा…“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी
प्रकाश गजभिजे यांचा रामटेक लोकसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी ठेवला तर नागपुरचे जिल्ह्याध्यक्ष राजू राऊत व अविनाश गोतमारे यांनी प्रस्तावाचे अनुमोदन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकाश गजभिजे यांच्या नावाची उमेदवारी जाहीर होताच ग्रामीण कार्यकारिणी सदस्य व तसेच युवा कार्यकर्त्यांनी हात उंच करून प्रस्तावाचे स्वागत केले.
READ ALSO :
हेही वाचा…“काल मृत्यू दारात उभा राहिला होता, केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो”, मोठ्या राड्यानंतर निखील वागळेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“मूर्खपणाचा डोंगर, संजय बांगर !” तर तुम्ही जेवण करू नका, बांगरांचा लहान मुलांना अजब सल्ला, विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचाभुजबळांची ह’त्या कशी अन् कधी करायची ? ‘त्या’ हॉटेलमध्ये शिजला कट, पत्रात धक्कादायक गोष्टी उघड
हेही वाचा…“निखिल वागळेंची गाडी फोडणारे आणि हल्ला करणारेही कुत्रेच होते का ?” रोहित पवारांचा रोखठोक फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं