पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांची योगी आदित्यनाथ यांनी प्रशंसा केली. ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम केले. त्याप्रमाणाचे श्री गोविंददेव गिरी महाराज आज काम करत आहेत. असे विधान केले. तर यावेळी योगी आदित्यनाथ यांचं स्वागत जिरेटोप करून करण्यात आलं. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा….महिन्याआधी भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची दावेदार, केतकी पाटलांचा रावेरमध्ये कार्यक्रमांचा धडका
गीता-भक्ती अमृत महोत्सवाच्या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं जिरेटोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महायुतीतील अनेक मंत्री देखील उपस्थित होते. परंतु यावरून प्रशांत जगताप यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टिका केली आहे. अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या विचारांचं पवित्र प्रतिक आहे हा जिरेटोप. समाजात द्वेष पेरणाऱ्या हिंस्त्र डोक्याची शोभा वाढवायला ही काही शोभेची वस्तू नाही. असं म्हणत जगताप यांनी भाजपला सुनावलं आहे.
हेही वाचा…महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटेना, महाराष्ट्राच्या प्रभारीला घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी गाठलं थेट मातोश्री
दरम्यान, महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण या मातीत पुज्य संतांचे सान्निध्य प्राप्त झाल्याचे सांगत योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले असे विधान केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपुर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्यांनी औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिले. तेव्हापासून औरंगजेबाला आतापर्यंत कुणीही विचारत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या विचारांचं पवित्र प्रतिक आहे हा जिरेटोप.
समाजात द्वेष पेरणाऱ्या हिंस्र डोक्याची शोभा वाढवायला ही काही शोभेची वस्तू नाही. pic.twitter.com/LKTYXFdNsQ— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
हेही वाचा…“राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय”, पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..शरद पवारांनी भाजपची वाचली कुंडली, शरद पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…बारामतीत पवार कुटुंबात संघर्ष पेटला, भावी खासदार म्हणून लागलेल्या ‘सुनेत्रा पवारां’च्या बॅनरवर शाईफेक
हेही वाचा…“तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील”, विरोधकांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा