पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता दोन्ही गटांमध्ये जोरदार चढाओढ बघायला मिळत आहे. यातच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्ध पवार असाच सामाना रंगण्याची शक्यता आहे. यातच एका बाजूला चर्चा सुरू असतांना आता रस्त्यावर देखील हा संघर्ष बघायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागल्यानंतर त्यावर शाई फेक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता खऱ्या संघर्षाला सुरूवात झाल्याची चर्चा राजकारणात सुरू आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” उद्धव ठाकरेंची टिका फडणवीसांना झोंबली
काऱ्हाडी येथे सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले. परंतु या बॅनरवर काही अज्ञात व्यक्तींना शाईफेक केल्याची घटना काल घडली आहे. शाई टाकली हा बाब तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी त्याची माहिती घेतली असता हा प्रकार रात्री झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा..“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
दरम्यान, शाई फेक प्रकार झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा बॅनर खाली उतरवण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीत पवार या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे कोणी राजकीय आकसापोटी हे कृत्य केले असावे, याबाबत पोलिसांनी माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे नक्की झाल्याचं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील”, विरोधकांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा..महिन्याआधी भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची दावेदार, केतकी पाटलांचा रावेरमध्ये कार्यक्रमांचा धडका
हेही वाचामहाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटेना, महाराष्ट्राच्या प्रभारीला घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी गाठलं थेट मातोश्री
हेही वाचा“आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलंय, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार”
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार ? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले…