मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. यातच आज मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यातच भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा पक्ष प्रवेश असा बॅनर देखील लावण्यात आला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील कार्यालयात उपस्थितीत झाले आहेत. यावर आता अशोक चव्हाण यांचे प्रमुख विरोधक आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…बारामतीत पवार कुटुंबात संघर्ष पेटला, भावी खासदार म्हणून लागलेल्या ‘सुनेत्रा पवारां’च्या बॅनरवर शाईफेक
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं मी अनेक दिवसापासून ऐकत आहे. भाजपमध्ये कोणीही प्रवेश करत आहे. त्याचं आम्ही स्वागत करणार आहे. असं यापुर्वी आम्ही म्हटलो आहे. अशोक चव्हाण वेगळ्या पक्षात काम करत आहे, मी वेगळ्या पक्षात काम करत आहे. आम्ही फक्त राजकीय विरोधक आहे. यातच आधीच नांदेडमध्ये भाजप बळकट आहे. यातच अशोक चव्हाण यांच्या येण्यामुळे आणखी बळकटी वाढेल. जो कुणी पक्षात येत असेल किंवा पक्षाचं काम करत असेल तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. अशी प्रतिक्रिया प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.
हेही वाचा…“तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील”, विरोधकांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. सुरूवातीला माजी मंत्री उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मुंबईतील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर याताच आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची मोठी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे याचा कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आमदारकीचा दिला राजीनामा ? राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचामहाराजांची जिरेटोप योगी आदित्यनाथांच्या डोक्यावर, शरद पवार गटाचा भाजपवर थयथयाट
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
हेही वाचा…“राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय”, पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..शरद पवारांनी भाजपची वाचली कुंडली, शरद पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल