मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर आता कॉंग्रेसचे अनेक बडे नेते देखील राजीनामा देण्यासाठी तयार झाले आहेत. यातच आता कॉंग्रेसचा हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. यातच कॉंग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणा आणि विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यात जवळपास एकतासपासून बैठक सुरू आहे. कॉंग्रेसच्या इतर नेत्यांना, आमदारांना आता या दोन नेत्यांकडून फोनाफोनी सुरू असल्याचं सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले छत्तीसगडकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा…“राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय”, पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान, चचेंबुरचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे, उमरेडचे आमदार राजू पारवे, पश्चिम नागपुरचे आमदार विकास ठाकरे, नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे, चंद्रपुर, राजूराचे सुभाष धोटे, रिसोड वाशिमचे अमित झनक हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, विधान परिषदेचे आमदार अमर राजुरकर हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे.
कॉंग्रेसचे १० आमदार राजीनामा देणार…..
(१)जितेश अंतापुरकर
(२) विश्वजीत कदम
(३)अमित झणक
(४)माधव जवळकर
(५)अमर राजूरकर
यांचा राजीनामा तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कॉंग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. कॉंग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत. भाजपमध्ये कोण कोण येणार आहे. याबाबत मी इतकंच सांगेन की आगे आगे देखो, होता है क्या अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
अशोक चव्हा
हेही वाचा…काँग्रेसला मोठे खिंडार? अशोक चव्हाणांसोबत जाण्यास कॉंग्रेसची मोठी फौज तयार, पाहा यादी
हेही वाचा..अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल ? चव्हाणांचा प्रमुख विरोधक खासदार प्रतापराव चिखलीकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आमदारकीचा दिला राजीनामा ? राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचामहाराजांची जिरेटोप योगी आदित्यनाथांच्या डोक्यावर, शरद पवार गटाचा भाजपवर थयथयाट