मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्य आणि कॉंग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक नेते, पदाधिकारी तसेच आमदार सोबत असल्याची माहिती समोर येत आहे. तर कॉंग्रेसचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते मैदानात उतरले आहेत. यातच आता राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, तसेच अद्यापही मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा… अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ खंदे समर्थकांना दिला राजीनामा, चर्चांना उधाण, कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ
कॉंग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्यचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर कॉंग्रेसचा देखील राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसमध्ये असतांना प्रमाणिकपणे काम केलं आहे. त्यामुळे मला कुणावरही टिका करायची नाही. यापुढची राजकीय दिशा येत्या दोन ते तीन दिवसात घेणार आहे. भाजपमधून राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी मिळणार म्हणून भाजपमध्ये जाणार आहे का ? यावर ते म्हणाले की मला भाजपची कार्यप्रणाली अद्यापही माहिती नाही. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे दोन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा….अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल ? चव्हाणांचा प्रमुख विरोधक खासदार प्रतापराव चिखलीकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
कॉंग्रेसमधून बाहेर जाण्याचा निर्णय का घेतला ? यावर बोलतांना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीला कारण हे असलचं पाहिजे असे काही नाही. मी माझ्या जन्मापासून आजतागायत कॉंग्रेस पक्षाचं काम केलं आहे. मला वाटतं की अन्य पर्याय पाहिले पाहिजे. त्यामुळेच मी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता काढायची नाही. तो माझा स्वभाव नाही. मला अद्यापही कुणीही संपर्क साधला नाही. तसेच मी पण देखील कोणत्याही आमदाराशी संपर्क केला नाही. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस पक्षाला राम राम, नाना पटोलेंनी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा…राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस पक्षाचा हिरो, मला कशाचीच भीती नाय,” कॉंग्रेसच्या ‘या’ आमदारांचं मोठं विधान
हेही वाचा…कॉंग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन दिग्गज मैदानात, राज्यात हालचालींना वेग, अशोक चव्हाणांचा राजीनामा
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”