पुणे : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार, पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते देखील भाजपच्या वाटेवर असल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेसचे डॅमेज कंट्रोल करतांना दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कसब्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…महाराजांची जिरेटोप योगी आदित्यनाथांच्या डोक्यावर, शरद पवार गटाचा भाजपवर थयथयाट
कॉंग्रेसने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेचं तिकीट दिलं. त्यानंतर महाविकास आघाडीसह कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून मला विधानसभेवर पाठवलं. यातच महाशक्ती माझ्याविरोधात निवडणुक लढत होती. त्या महाशक्तीच्या विरोधात जनतेनं मला कौल दिलं. त्यामुळे हा जनतेचा कौल असून आता सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचा हिरो आहे. कुठेही गेले तरी मला पाच पन्नास लोक भेटत असतात. तसेच माझ्यावर ईडीची कारवाई करण्यासाठी भाजपकडे काहीच नाही. त्यामुळे मला कशाचीच भीती नाही. त्यामुळे जनतेनेच मला मोठं केलं आहे. त्यामुळे मला कॉंग्रेसमधून जाण्याची काहीही गरज नाही. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
दरम्यान, भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भजापचा २५ वर्षाचा बालेकिल्ला उद्धवस्त करत विजय संपादन केले. त्यानंतर पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला. यातच आता सध्या कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली असून यात धंगेकरांची प्रतिक्रिया महत्वाची ठरत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन दिग्गज मैदानात, राज्यात हालचालींना वेग, अशोक चव्हाणांचा राजीनामा
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
हेही वाचा…काँग्रेसला मोठे खिंडार? अशोक चव्हाणांसोबत जाण्यास कॉंग्रेसची मोठी फौज तयार, पाहा यादी
हेही वाचा..अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल ? चव्हाणांचा प्रमुख विरोधक खासदार प्रतापराव चिखलीकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आमदारकीचा दिला राजीनामा ? राजकीय हालचाली वाढल्या