चंद्रपुर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकला. याआधी मागील एक महिन्यात कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तर अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक नेते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. एका बाजूला अनेक नेते कॉंग्रेसला सोडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने एका निवडणुकीत भाजपवर दणदणीत विजय मिळवला असल्याची बातमी समोर येत आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस पक्षाचा हिरो, मला कशाचीच भीती नाय,” कॉंग्रेसच्या ‘या’ आमदारांचं मोठं विधान
चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही सहकारी भात गिरणी संस्था मर्यादित सिंदेवाहीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कॉंग्रेस प्रणित पॅनलने भाजपवर दणदणित विजय मिळवला आहे. विजयाची परंपरा कायम राखत कॉंग्रेसने भाजपा प्रणित पॅनलचा ८ -३ असा पराभव करीत घवघवीत यश संपादित केले आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन दिग्गज मैदानात, राज्यात हालचालींना वेग, अशोक चव्हाणांचा राजीनामा
दरम्यान, सिंदेवाही सहकारी भात गिरणी संस्था मर्यादित सिंदेवाही निवडणुकीत कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष सुनील उट्टलवार, यादव बोरकर, विकास आदे, विलास रामटेके, सिंधूताई लोखंडे, छब्बूताई नागोसे, विनायक कावळे, सहदेव खोब्रागडे यांनी विजय मिळवला आहे. यावेळी विजयी उमेदवारांचा वडेट्टीवार यांनी सत्कार केला आणि पुढील वाचचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
भाजप प्रणित पॅनेलचा पराभव.
सिंदेवाही सहकारी भात गिरणी संस्था मर्यादित सिंदेवाही ची निवडणूक पार पडली. यात काँग्रेस प्रणित पॅनलने मागील विजयी परंपरा कायम राखत भाजपा प्रणित पॅनलचा ८-३ असा पराभव करीत घवघवीत यश संपादित केले.
विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार,… pic.twitter.com/OjRol54FFG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपाला आता कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“आगे आगे देखो होता है क्या..” फडणवीसांच्या विधानानंतर भाजप नेत्यांची धाकधुक वाढली, कुणाचं तिकीट, तर कोणाची खरकटी…?
हेही वाचा…कॉंग्रेसमधून राजीनामा का दिला ? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले….
अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस पक्षाला राम राम, नाना पटोलेंनी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा…राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….