छत्रपती संभाजीनगर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकल्यानंतर राज्यात आता संतापाची लाट सुरू झाली आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यावरून राज्यातील विरोधकांनी भाजपवर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन दिग्गज मैदानात, राज्यात हालचालींना वेग, अशोक चव्हाणांचा राजीनामा
मी मुख्यमंत्रीपदाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलेलो नाही तर मी जनतेच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात आहे. डरफोक, भेकट, भ्रष्ट लोकांना मी आजही सांगतोय की तुम्ही भाजपमध्ये जा. असं आवाहन करत जिथे कमी तिथे आम्ही म्हणणाऱ्या भाजपमध्ये आज अचानक वक्ते आणि कार्यकर्त्यांची कमी का भासायला लागली ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. वैजापुर येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
पुुढे बोलतांना ठाकरेंनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा. असं म्हणत त्यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भाजपवर सडकून टिका केली. आता कॉंग्रेसव्याप्त भाजपा म्हणावं लागेल. भविष्यात भाजपचा अध्यक्ष कॉंग्रेसची एखादी व्यक्ती असणार. असं म्हणत तुम्ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही तर मतदारांसोबत केली असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
रावणाला शिवधनुष्य नाही पेललं तर या पन्नास खोकेवाल्यांना काय पेलणार आहे? आमच्याकडे चौकीदार नाहीत. शिवसेनेचे राखणदार आहेत. शेतकरी जात मानत असाल तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवरचं कर्ज अजून जात का नाही ? तुमच्या लेखी जनता कुत्र्या-मांजरासारखी असेल तर मतं कुत्रे- मांजराकडे मागा. पण यांना कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण कुत्रा इमानदार असतो. असेही ठाकरेंनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“आगे आगे देखो होता है क्या..” फडणवीसांच्या विधानानंतर भाजप नेत्यांची धाकधुक वाढली, कुणाचं तिकीट, तर कोणाची खरकटी…?
हेही वाचा…कॉंग्रेसमधून राजीनामा का दिला ? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले….
अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस पक्षाला राम राम, नाना पटोलेंनी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा…राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस पक्षाचा हिरो, मला कशाचीच भीती नाय,” कॉंग्रेसच्या ‘या’ आमदारांचं मोठं विधान