मुंबई : लोकसभेच्या निवडणुका आधीच येत्या २८ फेब्रुवारी रोजी राज्यात राज्यसभेच्या निवडणुका होणार आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला तीन शिवसेना शिंदे गटाला एक, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक आणि कॉंग्रेसला एक जागा मिळण्याचा अंदाज होता. परंतु कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात येत असल्याने राज्यातील राज्यसभेच्या निवडणुकीचंही गणित बदलले आहेत.
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा राजीनामा..! परंतु कॉंग्रेसने ‘या’ निवडणुकीत भाजपला पाणी पाजलं, एकच चर्चा
अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे १४ आमदार भाजपसोबत येणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच येत्या राज्यसभेच्या निवडणुकीत देखील कॉंग्रेसचे आमदार विरोधात मतदान करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप आपला चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा असून येत्या दोन दिवसात यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत आहे.
हेही वाचा…“भाजपाला आता कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना या पक्षातील प्रत्येकी दोन आमदारांचे निधन झाल्यामुळे सध्या विधानसभेच्या आमदारांची संख्या २८६ झाली आहे. त्यामुळे २८६ भागिले ६ आणि अधिक एक असे मिळून राज्यसभेच्या उमेदवाराला विजयासाठी ४०.० मतांची आवश्यकता असणार आहे. यातच भाजपकडे सध्या १०४ आणि अन्य १३ अपक्षांची मतं मिळून भाजप ३ जागा सहजपणे निवडून आणू शकते. तर शिवसेनेकडे ३९ आमदार आणि १० अपक्षांची मतं मिळून शिंदे गटाला एक जागा मिळण्याची शक्यता तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसकडे ४५ आमदाराचं संख्याबळ असून कॉंग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाहीत.

READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शहांच्या ग्रीन सिग्नची प्रतिक्षा, एकच चर्चा
हेही वाचा…राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणुक, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण
हेही वाचा…ठरलं तर मग..! अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार, कॉंग्रेस खिंडार पडण्यास सुरूवात
हेही वाचा…“माझी शेवटची शोभा यात्राही कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल”, कॉंग्रेसच्या या नेत्याने घेतला प्रण
“श्रेय वादाची लढाई नाही!”धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेस अन् भाजपमध्ये जुंपली