मुंबई : राज्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेचे आमदार राजूरकर यांनी देखील भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला आणखी मोठं बळ मिळालं असून यावेळी अशोक चव्हाण यांचा उल्लेख राष्ट्रीय नेता म्हणून करत फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा…एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शहांच्या ग्रीन सिग्नची प्रतिक्षा, एकच चर्चा
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांना प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून अशोक चव्हाण यांना पक्षात रितसर प्रवेश दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांचा राष्ट्रीय नेता म्हणून उल्लेख करत मोठे संकेत दिले आहेत. यावेळी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारले असता. त्यावर म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे. त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणुक, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण
दरम्यान, येत्या २८ फेब्रवारीला राज्यसभेची निवडणुक होणार आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदत उद्या असून आजच भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजप तीन जागा निवडून आणू शकत होती. परंतु अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजप आपला चौथा उमेदवार देखील देण्याच्या तयारीत असून अशोक चव्हाण यांना आपली उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
हेही वाचा…मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच मिळणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेसला राम राम..,! काय आहे आदर्श घोटाळा ? वाचा सविस्तर
हेही वाचा…बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! शरद पवार गटाचा चव्हाणांना टोला
भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी ? भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत, रंगत वाढली