मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉंग्रेसला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना प्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना २०१० मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी ? भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत, रंगत वाढली
आदर्श घोटाळ्याचा आरोप भाजपनेच याआधी केला होता. त्यासंदर्भात भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार आरोप केले होते. परंतु त्याच अशोक चव्हाणांना भाजपने प्रवेश दिल्याची टिका विरोधकांनी केली आहे. तसेच विरोधकांकडून आता देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ देखील व्हायरल केला जात आहे. त्यावर बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, आदर्श सोसायटीची हाय कोर्टातला निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे. हा एक राजकीय अपघात म्हणावा लागेल. त्यामुळ त्याची फार काही चिंता मला नाही.
हेही वाचा…एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शहांच्या ग्रीन सिग्नची प्रतिक्षा, एकच चर्चा
दरम्यान, भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. भाजपचे आरोप-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यावर अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला आहे. त्यावर परिमाण म्हणून अशोक चव्हाण यांनी या त्रासाला कंटाळून भाजपात प्रवेश केला. कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते. त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते. असेही नाना पटोले यांनी सांगितलेय.
भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे
किंवा ते जनतेला मुर्ख समजतात.भाजपाचे आरोप – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत.
कृती – अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला
परिणाम- अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखलआता प्रश्न… pic.twitter.com/P1S04m3EVr
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 13, 2024
READ ALSO :
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
हेही वाचा…मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच मिळणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेसला राम राम..,! काय आहे आदर्श घोटाळा ? वाचा सविस्तर
हेही वाचा…बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! शरद पवार गटाचा चव्हाणांना टोला