मुंबई : पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची, त्यावेळी आम्ही कधीही राजकारण केलं नाही. मला खरंच त्या मुलीबद्दल प्रेम वाटतंय, याचं कारण असं की, ती एकटी लढतेय. तिचे वडिल गेलेले आहेत. त्यांच्या घरात कोणता कर्ता पुरूष नाही. १९९५ साली भाजपची सत्ता आली. तेव्हा दोन नेत्यांनी महाराष्ट्रात काॅंग्रेस सरकारविरूद्ध रान पेटवलं होतं आणि ते सत्तेत आले होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे, आज दोघेही हयात नाहीत. मात्र भाजप कोणत्या पद्धतीने आज त्यांच्या मुलींना वागतेवय? असा सवाल करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानावरून दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने माघार का घेतली ? शिंदे गटातील आमदाराने दिले स्पष्टीकरण
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आमचे विचार वेगळे होते, पण प्रमोद महाजन हे या देशाचे मोठे नेते होते. त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध अनेक वर्षाचे होते. माझ्या जन्मापासून प्रमोद महाजन आमच्या घरी यायचे. दुर्दैवाने ते लवकर गेले. गोपीनाथ मुंडेंनीही शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण केलं. आमचे राजकीय मतभेद होते, पण वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा…२०२४ च्या लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, बैठकीत ‘या’ नेत्यांवर केला शिक्कामोर्तब
दरम्यान, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे दोघंही मराठमोळी मुलं आहेत. महाराष्ट्राच्या मातीत त्यांचा जन्म झाला. दोघांनीही दिल्ली गाजवली. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. भाजपा हे विसरला असेल, पण मी नाही विसरले. कारण माझ्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला. असंही त्या म्हणाल्या. मागील काही वर्षापासून पंकजा मुंडे राज्यातील राजकारणाच्या केंद्रबिंदूत राहिल्या आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात असून त्यांच्यावर भाजपकडून अन्याय होत आहे. यावर पंकजा मुंडेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडेबाबत भाष्य केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“धंगेकरांचा पारा चढला..! अन् थेट ससून रूग्णालय गाठून ‘या’ प्रकरणाबाबत ससून रूग्णालय प्रशासनाला धरले धारेवर
हेही वाचा…“तेव्हा पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
हेही वाचा…चर्चेत असलेले गोगावले मंत्रीपद सोडून शिंदेंना साथ का देताहेत ? गोगावलेंनीच सांगितलं कारण
हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,