IMPIMP
Awha's reaction to Eknath Shinde and Raj Thackeray's visit, said they will go on honeymoon in March Awha's reaction to Eknath Shinde and Raj Thackeray's visit, said they will go on honeymoon in March

एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंच्या भेटीवर आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, मार्चमध्ये हनिमुनला जातील अन् त्यानंतर…

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी अलिकडच्या काळात वाढलेल्या दिसत आहेत. यातच दहा जानेवारीला शिवसेना अपात्र आमदार याचिकांवरील सुनावणीचा निकाल लागणार आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यातच अशा घटना होत असताना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे फेब्रुवारी महिन्यात एकत्र येतील असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा..“एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे ‘या’ महिन्यात एकत्र येणार”, शिंदे गटाच्या आमदाराने आतली बातमी फोडली 

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकीय भेट ही जाहीरपणे घेतली जात नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकारणातील मोठा बॉम्बस्फोट असेल. सध्याच्या घडीला ते एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. परंतु राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत प्रत्येकाची आवश्यकता प्रत्येकाला भासते, त्यामुळे राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आम्हाला आनंदच होईल. असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.

हेही वाचा…“ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही”, ठाकरेंचा हल्लाबोल, शिंदे अन् भाजपमधील नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश

दरम्यान, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारी महिन्यात एकत्रित येतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला. त्यावर विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  दुसऱ्याच्या घरात लग्न आहे अन् आतापासून अक्षता हातात घेऊन कसं बसू? ते कधी लग्न करताहेत, ते आधी बघा ना. इतकी घाई कशाला ? कदाचित मार्चमध्ये हनिमुनला जातील अन् त्यानंतर डिवोर्स घेतील.

READ ALSO :

हेही वाचा..“खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत,”महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर, खडसे-महाजन वाद पेटला 

हेही वाचा…“मिटकरी.. “आमदार” लिहिताना लाज वाटेल असं वागू नका,” सुळे आणि कोल्हेंवर केलेली टिका मिटकरींना भोवली 

हेही वाचा…सुप्रिया सुळेंनी बारामतीत ठोकला तळ ; दहा महिने बारामतीतच राहणार, निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात 

हेही वा“जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार, याची शाश्वती नाही” 

हेही वाचा..पदाधिकाऱ्यांना ८० गाड्या घेण्यासाठी अजित पवारांकडे १५ कोटी रूपये आले कुठून ? अंजली दमानियांचा सवाल