IMPIMP

“वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होतेय”, जलीलच्या लोकसभा युतीच्या प्रस्तावावर ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया

B team of washing machine is active Thackeray group's reaction to Jalil's Lok Sabha alliance proposal

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव पुन्हा दिला आहे. राज्यात मागच्या निवडणुकीत काॅंग्रेसचा फक्त एकच खासदार होता. आणि आमचा देखील एक खासदार होता आणि आता काॅंग्रेसचा एकही खासदार महाराष्ट्रात नाही. काॅंग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष आहे. त्यामुळे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत आघाडीचा विचार करावा असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक टोला हाणला आहे.

हेही वाचा…“राम मंदिर आस्थेचा विषय,या आस्थेला राजकीय वळण देऊ नका”, ठाकरे गटाची भाजपवर जोरदार टिका 

मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रात एमआयएम महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार आहे. परंतु महाविकास आघाडीतील नेते या युतीसाठी अनुकूल नाहीत. त्यातच आता जलील यांनी पुन्हा युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीसमोर ठेवला आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी जलील यांना फटकारत भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजपने पतंग चिन्हाचा हिरवा रूमाल गळ्यात घालून महाविकास आघाडीत मतभेद घडवण्यासाठी टाकू पाहिलेला मिठाचा खडा म्हणजे इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीत घुसण्याची मागणी आहे. वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होते आहे. हेच संकेत जलील यांच्या मागणीतून मिळतात असा टोला देखील त्यांनी लगावला.

हेही वाचा…आताच दोन यात्रा झाल्या, त्यातच आता संमेलन, खर्च कसा झेपणार? काॅंग्रेस नेत्यांचे वरिष्ठांकडे गाऱ्हाणे 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीचा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामाना रंगणार आहे. यातच आता युतीबाबत चर्चा केल्या जात आहेत. वंचितची शिवसेना ठाकरेंसोबत युती झालीय,  परंतु महाविकास आघाडीने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. दुसऱ्या बाजूला एमआयएम देखील महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहे. यातच आता जागावाटपाबाबत इंडिया आघाडीची २९ डिसेंबर रोजी बैठक होत आहे. त्यात आता काय घडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी ; मोदींसह भाजपच्या नेत्यांचे संपुर्ण देशात होणार दौरे 

हेही वाचा…ठाणे हादरलं..! शिंदे गटातील माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला, रॉडने गाडीच्या काचा फोडल्या, व्हिडीओ व्हायरल 

हेही वाचा..जपानची पदवी महाराष्ट्राला समर्पित..! फडणवीसांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान, पहिले भारतीय 

हेही वाचा..“तेव्हा विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता, तरीही..,”पंतप्रधानपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान 

हेही वाचा…सदावर्तेंच्या अस्तित्वाला मोठा धक्का, एसटी बॅंकेत महाभूकंप, १२ संचालकांचा तडकाफडकी राजीनामा 

Total
0
Shares
Previous Article
BJP has given the responsibility to 'this' leader to achieve hat-trick of victory

विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी ; मोदींसह भाजपच्या नेत्यांचे संपुर्ण देशात होणार दौरे

Next Article
The demand of Mahavikas Aghadi of the deprived to give 12 seats out of 48 Lok Sabha seats

लोकसभेसाठी वंचितने महाविकास आघाडीकडे मागितल्या 'इतक्या' जागा ; दोन आठवड्याची दिली मुदत, नाहीतर..

Related Posts
Total
0
Share