ठाणे : राज्यात मागील काही महिन्यांपासून हिंसक घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. बीडच्या जाळपोळ घटनेनंतर गुणरत्ने सदावर्ते यांची मुंबईत हल्लेखोरांनी गाडी फोडली. यातच आता ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घर आणि गाडीवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात एकच सध्या खळबळ उडाली आहे.
हेही वाचा..“पक्षांने आदेश दिला तर उद्या निवडणुक लढायला तयार”, रविंद्र धंगेकरांचं लोकसभा निवडणुकीबाबत सुचक विधान
माणिक पाटील यांच्या गाडी आणि घरावर हल्ला केल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये हल्ला करणारे एकूण चार ते पाच दिसत आहेत. त्यांच्यातील एक व्यक्ती गेटवर चढला असून त्याच्या डोक्यावर हेल्मेट होतं. तो हेल्मेट घालून बंगल्याच्या आता शिरला. त्याने गाडीच्या काचा फोडल्या. तर इतर व्यक्ती घरावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या हल्लानंतरपाटील कुटुंबीय भयभीत झालं आहे.
हेही वाचा..बाळा भेगडेंचा वाढदिवस अन् बारणेंचं टेन्शन वाढवणार ; मावळात महायुतीच्याच नेत्यांमध्ये चढाओढ
दरम्यान, माणिक पाटील यांनी याप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर शोधावं आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हल्लेखोरांनी पाटिल यांच्या घरावर हल्ला का केला आहे? याची माहिती अद्याप समोरआली नाही. परंतु याप्रकरणी कासार वडवली पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासपोलिस करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..जपानची पदवी महाराष्ट्राला समर्पित..! फडणवीसांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान, पहिले भारतीय
हेही वाचा..“तेव्हा विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता, तरीही..,”पंतप्रधानपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…सदावर्तेंच्या अस्तित्वाला मोठा धक्का, एसटी बॅंकेत महाभूकंप, १२ संचालकांचा तडकाफडकी राजीनामा
हेही वाचा…“राम मंदिर आस्थेचा विषय,या आस्थेला राजकीय वळण देऊ नका”, ठाकरे गटाची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा…आताच दोन यात्रा झाल्या, त्यातच आता संमेलन, खर्च कसा झेपणार? काॅंग्रेस नेत्यांचे वरिष्ठांकडे गाऱ्हाणे