मुंबई ; प्रसिद्ध वकिल गुणरत्ने सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला असून एसटी बॅंकेच्या १९पैकी १२ संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली असून एसटी महामंडळातील सदावर्ते याचं वचर्स्व खालसा झालं असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
हेही वाचा…अयोध्येचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही, पण राज ठाकरेंना मिळालं, भाजपने सेट केला मोठा प्लॅन
एस टी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅक अर्थात एसटी बॅंकेत ४४५० कोटींचा घोटाळा झाल्याचा संचालकांनी आरोप ठेवला आहे. त्यामुळे संचालकांनी हे राजीनाम्याचं पाऊल उचललं आहे. यापुर्वीच १४ संचालक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज या संचालकांनी थेट राजीनामा अस्त्र उगारल्याने सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. यानंतर १२ ही संचालकांनी यापुर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर गुणरत्ने सदावर्ते यांनीही सपत्नीक उदय सामंताची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आता ही राजकीय घडामोडी सुरू झालीय.
हेही वाचा…“सावनेरकरांवरील अवकळा अन् पापाचे ओझे गेले”, केदारांना निवडणुक लढवता येणार नाही, देशमुखांनी केदारांना डिवचलं
दरम्यान, सुरूवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्ने सदावर्ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेतलं. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं अन् एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनलही उतरवलं. त्यात त्यांच्या पॅनलला १९ पैकी १२ जागांवर विजय मिळवला. मात्र कुरबुरी काही थांबेनात. अखेर या कुरबुरीचा कडेलोट झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राम मंदिर आस्थेचा विषय,या आस्थेला राजकीय वळण देऊ नका”, ठाकरे गटाची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा…आताच दोन यात्रा झाल्या, त्यातच आता संमेलन, खर्च कसा झेपणार? काॅंग्रेस नेत्यांचे वरिष्ठांकडे गाऱ्हाणे
हेही वाचा..“पक्षांने आदेश दिला तर उद्या निवडणुक लढायला तयार”, रविंद्र धंगेकरांचं लोकसभा निवडणुकीबाबत सुचक विधान
हेही वाचा..बाळा भेगडेंचा वाढदिवस अन् बारणेंचं टेन्शन वाढवणार ; मावळात महायुतीच्याच नेत्यांमध्ये चढाओढ
हेही वाचा…वंचित आघाडीसोबत आली तर जागा किती मिळणार? अशोक चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…