मुंबई : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी सजली असून व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण देखील पाठवण्यास सुरूवात झाले आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. परंतु दुसऱ्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा…ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल..; असा असणार जरांगे पाटलांचा मुंबई दौरा
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील अनेक प्रमुखांना, महान व्यक्तींना तसेच राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यातच राज ठाकरे यांना देखील राम मंदिर ट्रस्टच्या वतीने २२ तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यातच राज ठाकरे यांचा अलिकडच्या काळात हिंदू जननायक असा उल्लेख केला जात आहे. राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा चेहरा मोठा करून उद्धव ठाकरे यांची इमेज डॅमेज करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका
दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा प्लॅन भाजपकडूनच सेट करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे एक महत्वाचे नेते हे सर्व नियोजन करणार असून राज ठाकरे यांना हिंदू जननायक अशी इमेज बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच एकनाथ शिंदे यांचा अलिकडील काळात हिंदूत्वाचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठं करून उद्धव ठाकरे यांना कमी करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यातच अयोध्येला येऊ न देणाऱ्या ब्रिजभूषण सिंगला देखील राज ठाकरेंच्या अपमानाची भरपाई भापजपने पुर्ण केली असल्याची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सावनेरकरांवरील अवकळा अन् पापाचे ओझे गेले”, केदारांना निवडणुक लढवता येणार नाही, देशमुखांनी केदारांना डिवचलं
हेही वाचा..“जितक्या शिंदे गटाला जागा, तितक्या आम्हाला द्या,”अजित पवार गटाची मागणी, भाजपची डोकेदुखी वाढली
हेही वाचा..“घरात बसून थोडचं राजकारण करता येईल”, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेत उद्धव ठाकरेंनी एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा”, गिरीश महाजन यांचं खुलं चॅलेंज
हेही वाचाकाल चॅलेंज दिलं, आज थेट मतदारसंघात दाखल, अजिदादांच्या भूमिकेनंतर कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले..