पुणे : शिरूर लोकसभेत आपला उमेदवार निवडून आणणारच असा थेट इशारा अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना काल दिला. त्यानंतर आज लगेच सकाळी सकाळी अजित पवारांनी शिरूरचा दौरा केला. त्यावरून राजकारणात एकच चर्चा सुरू झाली. तर दुसऱ्या बाजूला लगेचच खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी अमोल कोल्हे यांनी मोदी बागेतील कार्यलयात भेट घेतली आहे.
हेही वाचा…“केंद्राची कीड आता राज्यालाही लागली, भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय,” कुणी केली टिका?
शेतकरी आक्रोश मोर्चा हा उद्यापासून किल्ले शिवनेरीपासून सुरू होत आहे आणि २७, २८ आणि २९ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. हा मोर्चा सहा मुद्दे घेऊन सुरू करत आहोत. यामध्ये कांदा निर्यातवरील बंदी तातडीन उठवावी अशी प्रमुख मागणी आहे. बिबट सफर, दुधाचा दर, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी बरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज देण्याबाबत जाचक अटीबाबत धोरण निश्चित करण्यात यावं, अशा प्रमुख मागण्या या मोर्चामध्ये राहणार आहेत.
हेही वाचा…बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकचा धोबीपछाड; भारतीय कुस्ती संघ बरखास्त!
अजित दादा मोठे नेते आहेत. त्यामुळे मी काही बोलणार नाही. ते आता टिका करत आहेत. परंतु जेव्हा कान धरण्याचा अधिकार होता. तेव्हा त्यांनी धरला असता. तर बंर झालं असतं. असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित दादांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. यातच आज अजितदादांनी सकाळी सकाळी मांजरी येथील उड्डाण पुलाची पाहणी केली आहे. त्यावर बोलतांना मांजरीच्या उड्डाणपुलाची सहा महिन्यापुर्वीच पाहणी करून झालेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतर त्यांच्याकडे नागरिकांसाठी उड्डाणपुल खुल करण्याची मागणी केली होती. आज त्यांनी पाहणी केली आहे. माझ्या मतदारसंघातील नागरिकांना यामुळे सोयीचं होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
दरम्यान, यातच अब्दुला शादी में दिवाना बेगना असं म्हणत अमोल कोल्हे यांनी शिवाजी राव आढळराव पाटलांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघात कामे केली आहेत. त्यामुळे असं कुणी म्हटलं त्याला मान देत नाही. मी २०१९ मध्ये ज्याठिकाणी होतो. आता २०२३ आहे. मी आहे त्याठिकाणी आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी भुमिका बदलली आहे. त्यावर मी काही बोलू शकत नाही. असं म्हणत कोल्हेंनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल..; असा असणार जरांगे पाटलांचा मुंबई दौरा
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मोठा धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान
हेही वाचाकोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार