पुणे : पुढील निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत. तशा तशा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यातच अनेक बडे नेते पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. शिवसेना पक्ष फुटीनंतर अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे. यातच आता अजित पवार गटाचे नेते आणि अजित पवारांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची धाकधुक वाढली असून पुढील निवडणुकीत ते ठाकरे गटाकडून उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“तर लोकसभेच्या ४८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने पिंपरीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मातोश्रीवर झालेल्या भेटी दरम्यान खासदार संजय राऊत, राज्य संघटक एकनाथ पवार ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार योगेश बाबर उपस्थित होते.
हेही वाचा…आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कुणाला किती जागा मिळणार? धक्कादायक माहिती समोर
दरम्यान, संजोग वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मागील वेळी त्यांनी जोरदार तयारी केली होती. पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे वाघेरे यांना माघार घ्यावी लागली. आता महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सुटण्याची शक्यता असल्याने वाघेरे यांनी ठाकरे गटाची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती समोर आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान
हेही वाचाकोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
हेही वाचा…“केंद्राची कीड आता राज्यालाही लागली, भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय,” कुणी केली टिका?
हेही वाचा..बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकचा धोबीपछाड; भारतीय कुस्ती संघ बरखास्त!
हेही वाचा.कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार