नाशिक : बदलत्या राजकारणात पुन्हा सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी ठाकरे गटाने एकदिवसीय महाअधिवेशनासाठी नाशिक शहराची निवड केली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जानेवारी रोजी नाशकात ठाकरे गटाचे महाअधिवेशन भरविले जाणार असून याच दिवशी उद्धव ठाकरे यांची हुतात्मा अंनत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. अशी माहिती खासदार, सचिव विनायक राऊत यांनी दिली आहे. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान
राम मंदिराच्या कार्यक्रमाचं आमंत्रण येईल तेव्हा बघू. यातच २३ जानेवारीला सुभाष बाबू आणि बाळासाहेबांची जयंती आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना मीटिंब घ्याव्याच लागतात. घरात बसून राजकारण थोडचं करता येईल. अस म्हणत भुजबळांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच कोणाला बरोबर घ्यायचं, कोणाला बाजूला ठेवायचं ही चर्चा मीडियात थोडी होते. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या महाअधिवेशनात शेतकरी, कामगारांचे प्रश्न, वाढती महागाई, आदी प्रश्नांवर मंथन केले जाणार असून पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी धोरण ठरविले जाणार आहे. या महाअधिवेशनास ठाकरेंसह ठाकरे गटाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं यावेळी राऊत यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभेत उद्धव ठाकरेंनी एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा”, गिरीश महाजन यांचं खुलं चॅलेंज
हेही वाचाकाल चॅलेंज दिलं, आज थेट मतदारसंघात दाखल, अजिदादांच्या भूमिकेनंतर कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले..
हेही वाचा…ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल..; असा असणार जरांगे पाटलांचा मुंबई दौरा
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मोठा धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?