मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटांच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निवडणुकासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यातच जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला द्या, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. त्यामुळे जागावाटपावरून भाजपची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मोठा धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?
महायुतीत सध्या भाजपचे १०५ आमदार, शिंदे गटाचे ५० पेक्षा अधिक, तर अजित पवार गटाचे ४३ आमदार आहेत. यामुळे सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी आहोत. त्यानुसार शिंदे गटाला जितक्या जागा तितक्या आम्हाला देण्यात याव्यात असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जागा वाटपावरून भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण शिंदे गट आणि अजित पवार गट यावरून एकमेकांत भिडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात वाटपासंदर्भात अमित शहा यांच्यासोबत चर्चा होईल. याच महिन्यात बैठक अपेक्षित होती, मात्र विविध राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेचे अधिवेशन, महाराष्ट्रातलं विधानसभेचे अधिवेशन यामुळे बैठक लांबली. जानेवारी महिन्यात आमची महाराष्ट्रातल्या घटक पक्षांची बैठक होईल आणि त्यानंतर भाजप श्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचे नेते मिळून बैठक करतील असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“घरात बसून थोडचं राजकारण करता येईल”, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेत उद्धव ठाकरेंनी एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा”, गिरीश महाजन यांचं खुलं चॅलेंज
हेही वाचाकाल चॅलेंज दिलं, आज थेट मतदारसंघात दाखल, अजिदादांच्या भूमिकेनंतर कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले..
हेही वाचा…ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल..; असा असणार जरांगे पाटलांचा मुंबई दौरा
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका