पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच दिवगंत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. परंतु अद्यापही याठिकाणी पोटनिवडणुक झाली नाही. मध्यंतरी यानिवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयात केस दाखल झाली. परंतु त्यावर अद्यापही कोणताही निर्णय लागलेला नाही. यातच आता पुणे लोकसभेची निवडणुक पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे. यातच आता उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
हेही वाचा..“घरात बसून थोडचं राजकारण करता येईल”, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला
गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचा खासदार कोण होणार? याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यातच भाजपकडून अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. कसबा पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपला धोबीपछाड दिला होता. यातच लोकसभा निवडणुकीबाबत धंगेकर यांनी मोठं भाष्य केलं आहे. जनतेला धरून कुठलीही कामे होत नाही, शेवटची जनताच मतदारराजा आहे. पक्षानं ठरवलं तर उद्या निवडणुक लढायला तयार आहे. मग ती कुठलीही निवडणूक असेल असं धंगेकरांनी म्हटलंय.
हेही वाचा…“लोकसभेत उद्धव ठाकरेंनी एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा”, गिरीश महाजन यांचं खुलं चॅलेंज
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी भाजपकडून माजी महापौर मुरलिधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक त्याचबरोबर सुनील देवधर अशी अनेक नावं चर्चेत आली आहे. तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर, मोहन जोशी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता कुणाला उमेदवारी मिळणार? आणि कोण विजयी होणार ?त्याचं चित्र पुढील लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून समजणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..बाळा भेगडेंचा वाढदिवस अन् बारणेंचं टेन्शन वाढवणार ; मावळात महायुतीच्याच नेत्यांमध्ये चढाओढ
हेही वाचा…वंचित आघाडीसोबत आली तर जागा किती मिळणार? अशोक चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा.अयोध्येचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही, पण राज ठाकरेंना मिळालं, भाजपने सेट केला मोठा प्लॅन
हेही वाचा…“सावनेरकरांवरील अवकळा अन् पापाचे ओझे गेले”, केदारांना निवडणुक लढवता येणार नाही, देशमुखांनी केदारांना डिवचलं
हेही वाचा..“जितक्या शिंदे गटाला जागा, तितक्या आम्हाला द्या,”अजित पवार गटाची मागणी, भाजपची डोकेदुखी वाढली