मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील दिक्षांत सभागृहात पदवी प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री दिपक केसरकर, चंद्रकांत पाटील तसेच जपान मधील काही मान्यवर उपस्थित होते. यातच कोयासन विद्यापीठाने १२० वर्षाच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा..बाळा भेगडेंचा वाढदिवस अन् बारणेंचं टेन्शन वाढवणार ; मावळात महायुतीच्याच नेत्यांमध्ये चढाओढ
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. जपानमधील कोयासन विद्यापीठाची पदवी मिळवणारे देवेंद्र फडणवीस पहिलेच भारतीय ठरले आहे. यावेळी कोयासन विद्यापीठाचे प्रा. इन्युई रूनिन. वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील वाणिज्य दुत डॉ. फुकाहोरी यासुकाता हे उपस्थित होते.
हेही वाचा…वंचित आघाडीसोबत आली तर जागा किती मिळणार? अशोक चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
कोयासन विद्यापीठाने दिलेली मानद डॉक्टरेट पदवी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केली आहे. महाराष्ट्रातील जनतेमुळे राज्यात अनेक कामे करू शकलो. अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
READ ALSO :
हेही वाचा..“तेव्हा विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता, तरीही..,”पंतप्रधानपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…सदावर्तेंच्या अस्तित्वाला मोठा धक्का, एसटी बॅंकेत महाभूकंप, १२ संचालकांचा तडकाफडकी राजीनामा
हेही वाचा…“राम मंदिर आस्थेचा विषय,या आस्थेला राजकीय वळण देऊ नका”, ठाकरे गटाची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा…आताच दोन यात्रा झाल्या, त्यातच आता संमेलन, खर्च कसा झेपणार? काॅंग्रेस नेत्यांचे वरिष्ठांकडे गाऱ्हाणे
हेही वाचा..“पक्षांने आदेश दिला तर उद्या निवडणुक लढायला तयार”, रविंद्र धंगेकरांचं लोकसभा निवडणुकीबाबत सुचक विधान