मुंबई : केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती देऊन या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बाप असावा तर असा असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. बाप हा बापच असतो. पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नसावा, असा हल्ला विनायक राऊत यांनी चढवला आहे.
समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राणे पितापुत्रांवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही चिपी विनातळासाठी काय प्रयत्न केले आणि संबंधित विभागाने आमच्याशी काय पत्रव्यवहार केला हे काही अज्ञान माणसाला कळत नाही. त्यांना इंग्रजी समजत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं सांगतानाच आता जे बडेजाव मारतात, फुशारकी मारतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही. तुम्ही कोण सांगणारे? तुम्हाला कोणी अधिकार दिला? काही माहीत नसेल तर चार लोकांना विचारा. सोयीसाठी अमित शहांना विचारा. तुम्हाला काय अधिकार? काल टिंगूमिंगू सांगत होते बाप असावा तर असा. असावा. पण तो आयत्याबिळावरचा नागोबा नसावा, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
राणेंनी 1990 मध्ये या विमानतळाचं भूमिपूजन केलं. त्यानंतर ते 22 वर्ष गायब होते. केवढं मोठं कर्तृत्व. चार वर्षे खासदार होते. या चार वर्षात फिरकले नाही, कधी संसंदेत आवाज उठवला नाही, अशी टीका करतानाच तुम्हाला याचं श्रेय घेता येणार नाही. मी आणि वैभव नाईक यांनी पाहणी केली. 2014मध्ये आम्ही एमआयडीसीकडे विमानतळाचा स्टेट्स मागितला. तेव्हा त्यांनी अहवाल दिला. फक्त 14 टक्के काम झालं होतं. माती काढून खोदून ठेवली होती. मी, वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी सातत्याने प्रयत्न केला. केसरकरांनी डीपीसीतून निधी दिला. मी स्ट्रिट लाईटसाठी निधी दिला. सुभाष देसाईंनीही निधी दिला. 100 सुरक्षा पोलीस दिले. शंभुराजे देसाईंशी मिटिंग केली. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. पण श्रेयाची फुशारकी मिरवणाऱ्या राणेंनी तर अजिबात श्रेय घेऊ नये. बाप बाप म्हणणाऱ्या नितेश राणेंनालाही अधिकार नाही. हे ट्रेनवर पोस्टर लावून फिरणारे आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.
Read Also :
- ‘या’ अधिकाऱ्यावर होती हिरेनच्या हत्येची जबाबदरी, NIA च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
- विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
- पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
- सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
- भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी