सोलापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते पक्षांतर करीत आहे. तर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. यातच आता काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
“पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
काॅंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कट्टर समर्थक व महिला काॅंग्रेसच्या प्रदेश सचिव मुबीना मुलाणी यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे सोलापुरात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील काॅंग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच काॅंग्रेसच्या महिला प्रदेश सचिव मुबीना मुलाणी यांनी काॅंग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे देत आज पंढरपुरात रेस्टहाऊस येथे आरोग्य मंत्री तानाजी सांवत, शिवाजी सांवत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात शेकडो महिला कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केला.
“मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
दोन दिवसापुर्वी काॅंग्रेसचे काही आमदार भाजप अथवा शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चा सुरू होत्या. यामध्ये काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील त्यात समावेश होता. परंतु यावर अजून काही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे काॅंग्रेसच्या गोटातून अजूनही आमदार फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
दरम्यान, देशपातळीवर देखील काॅंग्रेसला उतरती कळा लागली आहे. काॅंग्रेसचे जुने जाणते नेत गुलाम नबी आझाद यांनी देखील काॅंग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. यातच आता सोलापुरात महिला कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काॅंग्रेसला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर शिंदे गट अजून ताकदीने उभा राहण्याची शक्यता आहे.
Read also
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
- “दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
- “आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
- “तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
- “उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल