मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप मोठी रणनीती आखत आहे. अलिकडेच केंद्रीय मंत्री अमित शहा देखील मुंबई दौऱ्यावर आले होते. अशातच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टिका केलीय.
“महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका
यावर शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मध्यंतरी कोरोनामध्ये बीकीसीमधील मैदानावर शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली. तसेच येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये भाजप काहीतरी कारणं काढून पळ काढीत आहे. ज्या ज्या वेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतात. त्यावेळी उद्धव ठाकरे गटप्रमुखांना मार्गदर्शन करीत असतात. तसेच हिमंत असेल तर शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन व्हावं, असं देखील भास्करराव जाधव यांनी म्हटलं आहे.
“हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा
महापालिका निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्केअर फुटाने विकण्याची जागा आहे. आमच्यासाठी ती 105 वीरांच्या बलिदानातून मिळवलेली मातृभूमी आहे. ती आमची आई आहे आणि आईवर वार करायला आलेल्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. काल शिवसेना प्रमुखांचा पक्ष मेळावा पार पडला त्यामध्ये ते बोलत होते.
“निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर, पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणुक घ्या अन् आणखीनच हिमंत असेल तर त्या सोबतच विधानसभेची निवडणुक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जामीन दाखवण्याची भाषा करीत आहता. परंतु आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्य़ाशिवाय राहणार नाही. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलं आहे. तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, अस देखील त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.
Read also
- “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, आदर देतोय, आदर घ्या…;” मनसेचा शरद पवारांवर निशाणा
- “तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार
- “ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर
- शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”
- “उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा