मुंबई : प्रख्यात कालिचरण महाराज उर्फ अभिजित सारंग हा त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडला आहे. मागील काही दिवसांमध्ये धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून प्रख्यात कालिचरण महाराज याला आज अटक करण्यात आली आहे.
नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला; विद्यापीठ विधेयकावरून सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
छत्तीसगड पोलीस हे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कालिचरण महाराजाच्या शोधावर होते. पोलिसांना गुंगारा देत कालिचरण महाराज एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी जात होता. अखेरीस मध्यप्रदेशात त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी देखील कालिचरण महाराजाने आक्षेपार्ह वक्तव्ये केलेली आहेत. कालिचरण महाराज हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातला आहे. लहानपणापासूनच तो अभ्यासात कच्चा असल्याने त्याने आठवीलाच शाळा सोडून दिली होती.
भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
आई वडिलांनी समजून सांगितल्यानंतरही त्याने ऐकलं नाही आणि पूजापाठ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच त्याने हरिद्वारला जाऊन दीक्षा घेतली होती. नंतर पुढे हाच अभिजीत सारंग कालीचरण महाराज झाला. देवी कालीका मातेचा भक्त म्हणून कालिचरण असं नाव धारण केलं. आपण कालीकामातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं त्यांनी याआधी कित्येकदा मुलाखतींमध्ये म्हटलं आहे. दोन वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला.
Read also:
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
- १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी