कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेते पक्ष संघटन वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता आपल्या जाहीर संभामधून राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांवर निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या निशाण्यावर मंत्री छगन भुजबळ होते, त्यानंतर धनंजय मुंडेंची मतदारसंघात शरद पवारांची सभा गाजली, आणि आता कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात सभा होत आहे.
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात
राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीत गर्जना होणार आहे. विकसनशील महाराष्ट्राचा निर्धार होणार आहे. पवार साहेबांच्या साथीने पुरोगामी महाराष्टारच्या विचारशील लढ्याला साथ देण्यासाठी शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता, शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, कोल्हापुर येथे शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आलीय.
हेही वाचा…शेतकऱ्यांची कांदाकोंडी भारती पवारांनी फोडली, उद्यापासून नाशकात कांदा लिलाव
दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्रा दौरा सुरू केला. सुरूवातीला त्यांनी मंत्री छगन भुजबळ त्यानंतर धनंजय मुंडे आणि आता हसन मुश्रीफ यांना टार्गेटवर ठेवलं आहे. त्यानंतर शरद पवारांची प्रफुल पटेल यांच्या गोंदियात सभा होणार आहे. यामुळे शरद पवारांनी आता राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांना टार्गेट करण्यास सुरूवात केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…महाविकास आघाडी इंडिया बैठकीसाठी सज्ज, बैठकीपुर्वी पत्रकार परिषद होणार
हेही वाचा…“राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काका शरद पवार गटात तर पुतण्या अजित पवार गटात दाखल”
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”
हेही वाचा…भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते, मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील नेत्यांनी मानले इस्रोचे आभार
हेही वाचा…शरद पवारांसह ठाकरे, अशोक चव्हाणांची मुंबईत बैठक, इंडिया मुंबईत जोरदार बॅंटिंग करणार