मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार तयारी सुरू केलीय. याचाच एक भाग म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षाची म्हणजेच इंडियाची मुंबईत बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर या बैठकीच्या आयोजनासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक काल पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हेही वाचा…शेतकऱ्यांची कांदाकोंडी भारती पवारांनी फोडली, उद्यापासून नाशकात कांदा लिलाव
इंडिया बैठकीच्या अगोदर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद होणार आहे. ३० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत इंडिया बैठकीबाबत माहिती देणार आहे. इंडियाची बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी इंडिया बैठकीसाठी सज्ज झालीय.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे आणखी ३ आमदार अजित पवार गटात जाणार, ? शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ “
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये इंडियाची होऊ घातली ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
हेही वाचा…अजित पवार बारामतीत जाणार, भव्य मिरवणुक अन् जंगी स्वागत, अजितदादांच्या कार्यक्रमाची चर्चा
दरम्यान, अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार एनडीए सोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र त्यानंतर शरद पवारांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगत मोदींच्या विरोधात राहणार असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काका शरद पवार गटात तर पुतण्या अजित पवार गटात दाखल”
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”
हेही वाचा…भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते, मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील नेत्यांनी मानले इस्रोचे आभार
हेही वाचा…शरद पवारांसह ठाकरे, अशोक चव्हाणांची मुंबईत बैठक, इंडिया मुंबईत जोरदार बॅंटिंग करणार
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात