नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे पार पडले. त्यानंतर आज नाशिकमध्येही मूक आंदोलन होत आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील १५ आमदारांचा पाठिंबा आहे. यात विधानसभा आज, उपसभापती नरहरी झिरवळ, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यांसोबत खासदार डॉ भारती पवार, हेमंत गोडसे यांनी आपली भूमिका मांडली.
हे पण वाचा, “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
आज खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन होत आहे. यावेळी, नाशिकचे पालकमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना, बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली, आणि यावरून मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यांना शांत करण्यासाठी संभाजीराजे स्वत: समोर आले. त्यांनी, ‘भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना खाली बसायला अडचण आहे. त्यांना खुर्चीवर बसू द्या, आपण सगळ्यांनी मन मोठे ठेवा,’ असं आवाहन केलं, यांनतर कार्यकर्ते शांत झाले.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
यांनतर, भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडली. यावेळी, त्यांनी खुर्चीवर का बसलो होतो, याचा खुलासाही केला. “छगन भुजबळ दुष्मन आहे, असा एक सतत अपप्रचार केला जातोय. हा लढा आपण एकत्र येऊन लढूया. आपला लढा या व्यवस्थेशी आहे, तो कुण्या एका व्यक्तीविरोधात नाही. त्यामुळे, आपल्याला चर्चेशिवाय मार्ग नाही,” असे सांगत त्यांनी, “मला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे खुर्चीवर बसलो,” असं स्पष्टीकरण दिलं.
हे पण वाचा, काही नेते ओबीसी, मराठा आणि इतर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत
तसेच, “मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, आघाडी सरकारमधल्या सर्वच घटक पक्षांची ही भूमिका आहे. आम्हाला कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, हे साध्य करायचं आहे. माझी आणि माझ्या पक्षाची देखील हीच भूमिका आहे. ओबीसी आक्रोश मोर्चा हा, मराठा आरक्षण विरोधात नाही. या दोन्ही समाजाचं आरक्षण, सुप्रीम कोर्टानं नाकारलं आहे आणि यांनतर दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा, काहींचा अयोग्य प्रयत्न सुरु आहे,” असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
- अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी अंगलट; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक
- बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार
- आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही; राऊतांचा भाजपवर पलटवार