नांदेड: नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झालेले आहे. याठिकाणी आता लवकरच पोटनिवणूक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्ष आता या मतदारसंघात ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे आणि ठिकठिकाणी छुप्या बैठका देखील सर्व पक्षांकडून सुरु झालेल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा हा बालेकिल्ला आहे. आता काँग्रेस आपला गड राखणार की पंढरपूर-मंगळवेढ्या प्रमाणे भारतीय जनता पक्ष इथं धक्का देणार याकडे सर्वांच्याच नजरा आता लागल्या आहेत.
हे पण वाचा, नाईलाजास्तव भाजपमध्ये गेलेल्या अस्वस्थ नेत्यांची घरवापसी करावी लागेल – अशोक चव्हाण
हे पण वाचा, मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा! अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मतदारसंघांच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये देगलूर बिलोली हा मतदारसंघ राखीव झाला आणि पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी विजयी होत थेट विधानसभा गाठली. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ही जागा जिंकली. पुन्हा २०१९ मध्ये काँग्रेसने ही जागा जिंकत आपले वर्चस्व या मतदार संघावर प्रस्थापित केले आणि रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले. शिवसेनेच्या साबणे यांचा २०१९ ला रावसाहेब अंतापूरकर यांनी दारुण पराभव केलता आणि आपल्या पराभवाची परतफेड केली.
हे पण वाचा, काँग्रेसने अशोक चव्हाणांकडे दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना महामारीचे संकट आले होते आणि त्यातच आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नांदेड दौरा केला होता. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी थांबून भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी सवांद साधला होता. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील या मतदार संघात दौरा केला आहे. दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात बिलोली, देगलूरचा दौरा करत विविध विकासकामांची उदघाटन केली आणि कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पोटनिवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
हे पण वाचा,
साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही; राऊतांचा भाजपवर पलटवार
शरद पवार दिल्लीला रवाना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान