मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे छगन भुजबळ देखील अजित पवार गटात दाखल झाले. याचा सर्वांनाच आश्वार्य वाटले. परंतु छगन भुजबळ इतक्यावरच थांबले नाही तर आपल्या भाषणातून त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी नाराज झालेत. यातच आता राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्याबाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष
जेलमध्ये असतांना भुजबळांच्या छातीत कळ यायची, अन् शरद पवारांना छगन भुजबळ ब्लॅकमेल करायचे, असा गोप्यस्फोट रमेश कदमांनी केला आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भ्रष्टाचार प्रकरणात तुरूंगात होते. सध्या रमेश कदम जामीनावर तुरूंगाच्या बाहेर आले आहेत. यातच तुरूंगातील आठवणी सांगताना छगन भुजबळांबाबत गौप्यस्फोट केला आहे.
हेही वाचा…” ती लोक मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून हिनवतात म्हणून घरे मिळत नाहीत”, आव्हाडांचं ‘त्या’ व्हिडीओवरून मोठं भाष्य
रमेश कदम म्हणाले की, तुरूंगात असणारे छगन भुजबळ दररोज आजारी पडायचे, अतिशय काकुळतीला येऊन त्यांना रोजच उपचाराची गरज होती. परंतु आताचे छगन भुजबळ एकदम फीट असून त्यांच्या कुठेही छातीत दुखत नसल्याची बातमी अलिकडे आली नाही. तुरूंगात छगन भुजबळ आजारी असल्याचं दाखवून लोकांची सहानूभूती मिळवत होते. शरद पवारांनी त्यांना मदत केली पाहिजे, बाहेर येण्यासाठी उशीर होतंय. त्याबद्दलची नाराजी ते बोलून दाखवत होते. माझा लवकरच जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्विकारावा लागेल. अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग करतांना आम्ही पाहिले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पुन्हा हे असं घडलं तर गालावर वळ उठतील,” मुंलूंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा
हेही वाचा…रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’ला नोटीस, ‘बारामती ॲग्रो’ नेमकी काय आहे ? वाचा सविस्तर
हेही वाचा…‘या’ तीन मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट होणार, भाजप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्राचा वापर करणार
हेही वाचा…“रोहित पवारांना नोटीस का आली ? याबद्दल माझ्या मनात 100 टक्के..,” आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“शरद पवारांचा विचार नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही,” गुणरत्ने सदावर्तेंची जोरदार टिका