मुंबई : मराठी माणसाला घर देणार नाही म्हणत मुलुंडमध्ये तुप्ती देवरूखकर यांना व त्यांच्या पतीला धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुप्ती यांनी यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राजकीय पक्षांनी मराठीच्या नावावर राजकारण करणे बंद करावे, शिवाजी महाराजांचे नावही घ्याचे बंद करावे असे म्हणत संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर मनसे आक्रमक होत संबंधित व्यक्तीला समज देऊन त्यांनी झालेल्या प्रकारची माफी मागितली. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…” ती लोक मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून हिनवतात म्हणून घरे मिळत नाहीत”, आव्हाडांचं ‘त्या’ व्हिडीओवरून मोठं भाष्य
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे ! असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, तृप्ती देवरुखकर यांना मराठी भाषिक असल्याच्या कारणावरून मुलुंड, मुंबई येथील शिवसदन सहकारी गृहनिर्माण संस्थेने सदनिका नाकारण्यात आली तसेच याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त मध्यामांवरून प्रसारित होत आहे. भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद 15 अन्वये धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करता येणार नाही अशी तरदुत करण्यात आली आहे. यामध्ये जात आणि भाषा अनुस्युत आहेत. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये सुद्धा विशिष्ट जाती, धर्म, भाषा यांना गृहनिर्माण संस्थेत घर देऊ नये अशी कोणतीही मुभा संस्थेला देण्यात आलेली नाही. असे असतानाही बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्था विशिष्ट जाती, धर्म, भाषा आणि आहार पद्धती या आधारावर उघडपणे भेदभाव करत आहेत.
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’ला नोटीस, ‘बारामती ॲग्रो’ नेमकी काय आहे ? वाचा सविस्तर
हेही वाचा…‘या’ तीन मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट होणार, भाजप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्राचा वापर करणार
हेही वाचा…“रोहित पवारांना नोटीस का आली ? याबद्दल माझ्या मनात 100 टक्के..,” आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“शरद पवारांचा विचार नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही,” गुणरत्ने सदावर्तेंची जोरदार टिका
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष